Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
अरेबिक मेहंदी
लग्नसराई लेख

अरेबिक मेहंदी

Arebic mehandiगो-या आणि नाजूक हातावर मेंदी(मेहंदी)ची नक्षी अलगद उतरत जाते. अगदी हातभर मेंदी काढून त्यात नव-याचं नाव लिहिणं आणि लग्नात त्याला ते शोधायला लावणं हा खेळ तसा जुनाच. या मेंदीची नक्षीही फॅशनप्रमाणे बदलत गेली. काही हौशी मुली अगदी हातभर कोपरापर्यंत मेंदी काढून घेतात. पण काहींना हातभर काढून घ्यायलाही वेळ नसतो.

त्यामुळे ज्यांना वेळ अगदी कमी आहे किंवा ज्यांना भरगच्च मेंदी आवडत नसेल त्यांनी अरेबिक मेंदीचा पर्याय निवडावा. फक्त बोटांवर काढलेली अरेबिक मेंदीची नक्षीही खूप छान आणि ट्रेंण्डी लूक देते.अरेबिक मेहंदी साडी, लेहंगा, शरारा व अनारकली ड्रेस बरोबर छान दिसते. अरेबिक मेहंदी आफ्रिकन किंवा भारतीय नक्षीपेक्षा जास्त प्रभावी दिसते.
आकर्षक करण्यासाठी आजकाल मेहन्दिमध्ये स्पर्कल कलर्स ही भारतात. मेहंदित खडे , कुंदन भरूनही वेगळा लुक देत येतो. दुल्हन मेंदीचा ट्रेण्ड तर अगदी वर्षानुर्वष तसाच आहे. त्यातल्या नक्षीत बदल झाला असेल पण ही मेंदी हातवर काढेपर्यंत बराच वेळ लागतो. त्यामुळे पार्लरमध्ये रेडिमेड मेंदी, अरेबिक मेंदी आणि दुल्हन मेंदीचे टॅटू आले आहेत, जे हुबेहूब रंगलेल्या मेहंदीसारखे दिसतात. लग्नात काढलेली झकास मेहंदी अल्बम मध्ये राहतेच पण आपल्या मनाच्या कोपऱ्यातही आयुष्यभर टिकून राहते.

 

Facebook Image

twiter


sankalp-ad2

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla