Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider

उत्सव

Ganesh Murti 75श्री'ची प्राणप्रतिष्ठापना - श्रीगणेश पूजनाचा विधी.

श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरी श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा व पूजा करावयाची असल्याने घरातील वातावरण प्रसन्न असावे. या दिवशी करावयाच्या पूजेसाठी आवश्यक असलेल्या पूजा साहित्याची जमवाजमव शक्यतो आदल्या दिवशी रात्री करून ठेवावी. फक्त पूजेसाठी लागणारे पाणी, पंचामृत , नैवेद्य वगैरे तयारी स्नानानंतर शुचिर्भूत होऊन करावी.जेथे गणपती बसवायाचा ते स्थान झाडून पुसून स्वच्छ ठेवावे.Read more

 

खाऊगल्ली

modak smallबाप्पाचे आवडते मोदक !

गणपतीच्या नैवेद्याला मोदक हवेतच. चतुर्थीच्या दिवशी घराघरांतून मोदकांचा दरवळ येतो. तळलेले मोदकही नैवेद्यासाठी केले जातात. गृहिणी आपल्या कौशल्याने वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बाप्पासाठी करतात. खास तुमच्यासाठी मोदकांच्या काही रेसिपीज ...
१. उकडीचे मोदक -खवललेले खोबरे व गुळ एकत्र करून शिजवावे. त्यात भाजून घेतलेली खसखस व वेलची पूड घालून घट्ट सारण करून घ्यावे.
Read more

घरकुल

luxury housing in puneघर सजवताना

आपलं घर इतरांपेक्षा आगळंवेगळं दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. बाजारात रोज नव्याने येणाऱ्या सजावटीच्या विविध गोष्टींचा आपण कुशलतेनं वापर करून जरा "हट के' इंटेरियर केलं तर हे सहज शक्य होतं आणि त्यासाठी फार जास्त पैसे खर्च करण्याचीही गरज नसते.कोणत्याही घराचे डिझाईनिंग करताना आधी जागेचा अभ्यास करून संबंधितांना केलेल्या डिझाईनचा अधिकाधिक वापर कसा होईल या दृष्टीने डिझाईन करण्यावर भर दिला जातो.

Read more

शिक्षण

j0409270 स्टाईलीश  वाचन

वाचन ही तशी व्यक्तीपरत्वे कमी अधिक आवड (आणि सवड) असणारी बाब. मात्र तरीही प्रत्येक पिढी 'आजकालची मुले वाचतच नाहीत' असे म्हणतच असते. त्याला खरंच नाइलाज आहे. मात्र असे असले तरी आजकालची मुले वाचतच नाहीत ही ओरड काही तितकिशी  खरी नाही. मुले ( इथे मुले आणि मुली या दोन्ही अर्थाने हा शब्द योजला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.)वाचतात, खरच वाचतात.
Read more

 टेक गुरु

canwasAndroid फोन विकत घेताना…….

आजच्या धकाधकीच्या जिवनात आपण जास्त विचार न करता मोबाईलच्या दुकानात जाऊन सरळ “ चांगल्यातला मोबाईल दाखवा दादा” म्हणून तो जो मोबाईल देईल तो घेतो व नंतर त्याच कीमतीत याहुन चांगला फोन कोणी घेतला कि मग आपल्याला कुठे तरी वाटते की घेतानाच आपण ४ ठीकाणी विचारायला हवे होते. काही साध्या गोष्टी आपणाला माहीत असणे गरजेचे असते. 
Read more

अर्थकारण

Financeअर्थसंस्कार

 आईवडिलांकडून मुलांवर कळत नकळत संस्कार होत असतात. चांगला आणि यशस्वी माणूस बनण्यासाठी या संस्कारांना अनन्यसाधारण महत्व आहे. आधुनिक काळात यात भर पडली आहे ती आर्थिक संस्कारांची, पूर्वीपासून बचतीचे महत्व एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला दिले जाते. पण आता बचतीबरोबर गुंतवणुकीचे महत्व ठसवणे गरजेचे आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर संस्कार आणि शिस्त यांचे संदर्भ बदलत जातात.

Read more

निवडक कथा / लेख


भटकंती

punakha - Bhutanभूतान - सुखी देशाची सफर

वळणावळणाच्या रस्त्याने हिरव्यागार जंगलाचा नजारा डोळ्यात साठवत थिम्पु कधी गाठले ते कळलेच नाही.इवल्याश्या रिमझिम पावसामुळे मस्त गारवा जाणवत होता. आणि या सुखाच्या लहरीवर आम्ही सगळे विराजमान झालो होतो. वाटेत एका ठिकाणी चहासाठी थांबलो ते हॉटेल कड्याच्या टोकावरच होते. हॉटेलच्या काचेच्या खिडकीतून ढगांच्या दुलईत लपेटलेल्या मागच्या डोंगररांगा बघत गरमागरम चहा पिणे म्हणजे अप्रतिम आनंद !
Read more

 

  

 फॅशन 

jeansजीन्स वापरा आता पावसाळ्यातही ….

फॅशनच्या युगात जीन्स असा एक पेहराव आहे की कधी आऊटडेटेड होत नाही. कितीही जुनी किंवा बोअर वाटली तरी फॅशन प्रेींमध्ये जीन्सची क्रेझ अजूनही कायम आहे. दररोज कॉलेजला जाताना इस्त्री करण्यात वेळ जातो म्हणून त्यावरील उत्तम उपाय म्हणून जीन्सचा वापर होतो. जीन्सला तशी कुठं रोज इस्त्री करावी लागते.जीन्समध्ये हायवेस्ट, मीड वेस्ट हे प्रकार तर फेव्हरेट होतेच मात्र लो वेस्ट जीन्सनेही तरुणांध्ये जादू केली आहे. Read more

 

 

आरोग्य

autumn-wallpapersशरद ऋतूतील आरोग्यदायी आहार

प्रत्येक ऋतूनुसार आहारात बदल करणे गरजेचे असते. ऋतूनुसार हवेत दमटपणा , कोरडेपणा, उष्णता, थंडपणा कमी अधिक होत असतो. त्याचा परिणाम शरीरावर होत असतो. शरीरातील वात, पित्त, कफ यांच्यामध्ये बदल होऊन त्यानुसार आजार होण्याची शक्यता असते. उदा. पावसाळ्यात हवा दमट असते त्यामुळे सर्दी, खोकला, दमा इ. कफाचे आजार, संधीवात , आमवात इ. वाताचे आजार होतात. पण आपण जर ऋतूनुसार आपल्या आहारात बदल केला,Read more

अध्यात्म

mahalaxmi mata kolhapurदेवीची महाराष्ट्रातील साडे तीन शक्तिपीठे

नवरात्रोत्सवाला आता प्रारंभ होत असून प्राचीन काळापासून शक्‍तीच्या उपासनेला खूप महत्त्व दिले गेले आहे.शक्तीची उपासना माणसाला नेहमीच प्रेरणादायी ठरते. महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्ती पीठे आहेत. तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका ही तीन पूर्ण तर वणीची सप्तशृंगी हे अर्धे शक्‍तिपीठ मानले जाते.महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांपैकी पहिले पीठ कोलापूर (कोल्हापूर) हे असून येथे श्री महालक्ष्मी-देवीचा सदैव वास असतो.Read more

 मनोरंजन

don specialनाटक रिव्ह्यू -दोन स्पेशल

अथर्व थिएटर आणि मिश्री थिएटर निर्मित आणि क्षितीज पटवर्धन लिखीत-दिग्दर्शित, ‘दोन स्पेशल’ हे नाटक मागच्या वर्षी २०१५ मध्ये रंगभूमीवर आले. ह. मो. मराठे यांच्या कथेवर जरी हे नाटक आधारित असले, तरीही पूर्णपणे नवी संहिता वाटावी, अशा पध्दतीने हे नाटक आपल्यासमोर येते.पत्रकारिता करताना दोन पत्रकार एकमेकांच्या प्रेमात पडतात.  पण पुढे परिस्थितीमुळे त्यांची ताटातूट होते. साधारणपणे १० वर्षांनी त्यांची पुन्हा भेट होते 
Read more

 

 

लग्नसराई

saptpadiसप्तपदी मी रोज चालते …

लग्न म्हणजे समाजाने निर्माण केलेली व्यवस्था, जिथे स्त्री आणि पुरुष कायदेशीररीत्या धार्मिक विधींसह कायमसाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. पण खऱ्या अर्थाने सांगायचे झाल्यास लग्न म्हणजे सामाजिक , आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या स्वतंत्र वातावरणात वाढलेल्या दोन घराण्यांतील व्यक्ती एकत्र येऊन त्यांनी जन्मभर एकत्र राहण्याचा केलेला विलक्षण प्रयोग !
Read more

 

आवर्जून वाचण्याजोगे लेख आणि कविता

Our Advertisers

Advertise with us: | Call :9769261182  

Facebook Image

twiter


sankalp-ad2

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla