Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
प्रदोषव्रत
Vratavaikalye

प्रदोषव्रत

हे व्रत म्हणजे प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करून सूर्यास्तानंतर प्रदोष काळात शिवपूजा करणे . नंतर भोजन करून उपवास सोडतात . पंचांगात प्रदोष काळाचा उल्लेख ठळकपणे केलेला असतो तो पाहावा . प्रदोष काळ सोमवारी असेल तर त्यास सोम प्रदोष , मंगळवारी असेल तर भौम प्रदोष व शनिवारी असल्यास शनि प्रदोष म्हणतात . महिन्यातून असे दोन प्रदोष काळ असतात . अनेक कुटुंबात हे व्रत पिढ्यानपिढ्या चालू असते . काही जण विशिष्ट कामनाप्रित्यर्थ हे व्रत तीन वर्षे किंवा बारा वर्षे करतात . या व्रतामुळे माणसाच कौटुंबिक व ऐहिक जीवन सुखच होत आणि भक्ती व उपसानेतही प्रगती होऊन पारमार्थिक आनंद मिळतो . जीवनात समाधान , तृप्ती आणि कृतार्थतेचा आनंद मिळतो .

भौम प्रदोषामुळे आर्थिक प्रश्न सुटतात. धनप्राप्ती होऊन कर्जबाजारीपण दूर होत . शनि प्रदोषा मुळे संतान प्राप्ती होते . इतकच नव्हे तर संतानातील दोषही दूर होतात . ते सदाचरणी होतात. हे व्रत शक्यतो उत्तरायणात सुरु करतात . कारण हा काळ पारमार्थिक दृष्ट्या इष्ट मानला जातो . हे व्रत स्त्री वा पुरुष कुणीही करू शकतो .

Facebook Image

twiter


sankalp-ad2

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla