Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
एकादशी व्रत
Vratavaikalye

एकादशी व्रत

हे व्रत चातुर्मासात करावयाच्या अनेक व्रतांपैकी एक व्रत आहे . नित्य एकादशी व्रत करण हा वारकरी संप्रदायाचा एक पारंपारिक उपक्रम आहे . महाराष्ट्रातील मोठं प्राबल्य असलेले वारकरी संप्रदायाचे भक्त भागवत धर्माचे पुरस्कर्ते आहेत . त्यानुसार प्रत्येक वारकरी एकादशीचा उपवास जन्मभर करतो .नामस्मरण , हरिकीर्तन , नित्य हरिपाठ वाचन , तुळसी माळ आणि एकादशीचा उपवास हा त्यांचा नित्यक्रम आहे . हे वारकरी म्हणजे विष्णूभक्त नेहमी भागवत एकादशी करतात . महिन्यातील दोन एकादशा याप्रमाणे वर्षाच्या सर्व एकादशा उपवास करून द्वादशीला उपवास सोडण्याची पद्धत आहे . ज्यावेळी दोन एकादशा असतात त्यावेळी पंचांगात स्मार्त व भागवत असा उल्लेख असतो . पण जेव्हा असा स्पष्ट उल्लेख नसेल तेव्हा ही एकादशी सर्व संप्रदायाचे भक्त करतात .

एकादशी व्रताची सुरुवात सामन्यत: आषाढी एकादशीला करतात . अनेक कुटुंबात आषाढी व कार्तिकी या दोन्ही महाएकादशांना उपवास करण्याची परंपरा पिढ्यानपिढ्या चालू आहे

Facebook Image

twiter


sankalp-ad2

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla