Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
जीवंतिका पूजन
Vratavaikalye

जीवंतिका पूजन

हे चातुर्मासातील एक पारंपारिक व्रत असून श्रावणाच्या दर शुक्रवारी हे व्रत करतात . या दिवशी सात जिवंतीकांच पूजन करतात . जीवंतिका ह्या सप्तदेवता असून त्या माणसाच्या अर्भक , शिशु , बाल , पौगंड , तारुण्य , प्रौढत्व व वृद्धत्व या सात अवस्थांना प्रभावित करतात . या सात देवतांची चित्रे असलेले मुद्रित पट मार्केटमध्ये मिळतात . त्यात सात जीवंतिका व सात बालके अशी सात चित्रे असून या चित्रपटाचे स्त्रिया दर शुक्रवारी पूजन करतात व श्रावण महिन्याच्या शेवटी त्याचे विसर्जन करतात . पूजेत या पटाला हार फुले वाहून जिवंतीकांची आरती म्हणतात . काही कुटुंबात मुला - मुलींना औक्षण केले जाते . संततीस दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभावे म्हणून हे व्रत करतात . सायंकाळी सुवासिनींना हळदी - कुंकू , दूध व साखरफुटाणे देतात .

Facebook Image

twiter


sankalp-ad2

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla