Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
मंगळागौरी व्रत
Vratavaikalye

मंगळागौरी व्रत

श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रियांनी आपलं सौभाग्य अखंड टिकण्यासाठी मंगळागौरीची पूजा करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे . या व्रताचा कालावधी पाच वर्षे किंवा सोळा वर्षांचा असतो . या दिवशी नवविवाहिता उमा - महेश्वराची पूजा करतात . काही ठिकाणी या पूजेसाठी सोळा सुवासिनींना बोलावण्याची पद्धत आहे . या दिवशी संध्याकाळी सुवासिनींना हळदी - कुंकू देऊन गव्हाने त्यांच्या ओट्या भरतात . रात्री मंगळागौरीची आरती करून मंगळागौर जागवतात . गाणी , उखाणे , फुगड्या , नाव घेणे , विविध प्रकारचे मंगळागौरीचे खेळ करून रात्र जागवतात . दुसऱ्या दिवशी सकाळी दहीभाताचा नैवेद्य दाखवून मंगळागौरीचे विसर्जन करतात .

Facebook Image

twiter


sankalp-ad2

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla