Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
श्रीलक्ष्मी व्रत
Vratavaikalye

श्रीलक्ष्मी व्रत

संपत्ती , समृद्धी व धन यांची बरकत प्राप्त होण्यासाठी हे व्रत करतात . या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी करतात व शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करतात . त्यानंतर वर्षभर दर गुरुवारी देवासमोर बसून श्रीलक्ष्मी व्रताची कथा व श्रीलक्ष्मी महात्म्याच वाचन कराव . हे व्रत स्त्री - पुरुष दोहोनीही केलं तरी चालत . मार्गशीर्षातील दर गुरुवारी दिवसभर उपवास करून संध्याकाळी श्रीलक्ष्मीची पूजा व आरती करून उपवास सोडवा व आपली इच्छा श्रीलक्ष्मी मातेला सांगावी . काही जण कायम स्वरूपी गुरुवारचे उपवास करतात . या व्रताची माहिती देणारी पुस्तिका बाजारात उपलब्ध असते .
त्यात सांगितल्याप्रमाणे हे व्रत करावे .

आपल्या आर्थिक भरभराटीसाठी रोज खालील प्रार्थना लक्ष्मी देवीला करावी .

हे लक्ष्मी माते भगवती , यथाशक्ती यथामती ,
सेवा करीतो आम्ही ती , मान्य करुनी घेई तू .
आम्ही बालके अज्ञ म्हणोनी . अपराधांची क्षमा करोनी,
झडकरी येई गे धावोनी , प्रसन्न होई आम्हाते .
कृपा करावी आम्हावरी , तुझे वास्तव्य असो घरीदारी ,
दु:ख दारिद्र्य निवारी , सुखी ठेवी सर्वांना .
विपुल लाभो धनसंपत्ती , कधी न येवो आपत्ती ,
आयुष्यवान होवो संतती , भाग्य आमुचे उजळावे.
महामाये जगन्माते , शंखचक्र गदाहास्ते ,
कमलासने सुरपूजिते , लक्ष्मीदेवी नमोस्तुते .
श्रीलक्ष्मी देव्यै नमो नमः .

Facebook Image

twiter


sankalp-ad2

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla