Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
संतोषी मातेचे व्रत
Vratavaikalye

संतोषी मातेचे व्रत

कौटुंबिक जीवनात संतुष्टता देणारी देवी म्हणजे संतोषी माता अशी मान्यता आहे . भारतातील सर्व राज्यातील सर्व जातीधर्माच्या स्त्रिया हे व्रत करतात .

या व्रताची माहिती देणारी पुस्तिका बाजारात उपलब्ध असते . त्यात सांगितल्याप्रमाणे हे व्रत करावे .

या व्रताची सुरुवात चातुर्मासात करतात . हे व्रत चार महिने , एक वर्ष किंवा तीन वर्ष दर शुक्रवारी करायच असत . किमान सोळा शुक्रवार हे व्रत करून त्याच उद्दापन करतात . काही अडचण आली तरी घरातील इतर कुटुंबियांकडून संतोषी मातेची पूजा करावी व कहाणी वाचून घ्यावी . उपवास मात्र आपण स्वतः करावा .

या व्रताची मुख्य अट म्हणजे या व्रताच्या दिवशी घरात कुणीही आंबट खायचे नसते . संतोषी मातेची पूजा व आरती करून तिला दुध - गूळ - चणे यांचा नैवेद्य दाखवायचा असतो . त्यातील एक भाग नंतर गाईला खायला घालून उरलेला नैवेद्य सर्व कुटुंबीयांनी सेवन करावयाचा असतो . या व्रताचे उद्यापन सतराव्या शुक्रवारी करायचे असते . पण या दिवशी अडचण आल्यास व्रत उद्यापन होईतो कायम ठेवायचे असते .

या व्रताचे प्रमुख उपचार म्हणजे पूजा , आरती , समंत्रक नैवेद्य , पोथी आणि उपवास .

हे व्रत केल्याने प्रापंचिक जीवन सुखी होते , ऐश्वर्य प्राप्त होते , तसेच इतरही लौकिक स्वरूपाच्या मनोकामना सफल होतात अशी भक्तांची धारणा आहे .

Facebook Image

twiter


sankalp-ad2

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla