Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
Marathi Vratvakalya
ऋषीपंचमी
Vratavaikalye

ऋषीपंचमी

गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे भाद्रपद शु . पंचमीस स्त्रिया हे व्रत करतात . आपल्या श्रेष्ठ ऋषीच्या सत्विकतेला , त्यांच्या अंगी असलेल्या उदात्त गुणांना विनम्रतेने अभिवादन करून त्यांचे पूजन करण्याचे हे व्रत आहे . त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी हे व्रत अंगीकारून वैदिक , तत्वज्ञान , वैदिक धर्म आणि वैदिक संस्कृती ज्यांनी निर्माण केली त्या ज्ञान निष्ठांना , कर्म योग्यांना आणि तपोनिधींना या दिवशी व्रतस्थपणे आदरांजली वाहायला हवी .

Read more...
 
एकादशी व्रत
Vratavaikalye

एकादशी व्रत

हे व्रत चातुर्मासात करावयाच्या अनेक व्रतांपैकी एक व्रत आहे . नित्य एकादशी व्रत करण हा वारकरी संप्रदायाचा एक पारंपारिक उपक्रम आहे . महाराष्ट्रातील मोठं प्राबल्य असलेले वारकरी संप्रदायाचे भक्त भागवत धर्माचे पुरस्कर्ते आहेत . त्यानुसार प्रत्येक वारकरी एकादशीचा उपवास जन्मभर करतो .नामस्मरण , हरिकीर्तन , नित्य हरिपाठ वाचन , तुळसी माळ आणि एकादशीचा उपवास हा त्यांचा नित्यक्रम आहे . हे वारकरी म्हणजे विष्णूभक्त नेहमी भागवत एकादशी करतात . महिन्यातील दोन एकादशा याप्रमाणे वर्षाच्या सर्व एकादशा उपवास करून द्वादशीला उपवास सोडण्याची पद्धत आहे . ज्यावेळी दोन एकादशा असतात त्यावेळी पंचांगात स्मार्त व भागवत असा उल्लेख असतो . पण जेव्हा असा स्पष्ट उल्लेख नसेल तेव्हा ही एकादशी सर्व संप्रदायाचे भक्त करतात .

Read more...
 
चैत्र गौरीचे हळदीकुंकू
Vratavaikalye

चैत्र गौरीचे हळदीकुंकू

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चैत्र शु . तृतीयेला गौरी तृतिया साजरी होते . या दिवशी गौरीची पूजा करून तिला लाकडी किंवा पितळी हिंदोळ्यावर बसविली जाते व नंतर तिला गाणी म्हणत झोके देतात . काही ठिकाणी या पुजेस दोलोत्सव असेही म्हणतात आणि तो अक्षय्य तृतीयेपर्यंत चालू असतो .या दिवशी स्त्रिया सुवासिनींना - हळदी - कुंकू देऊन त्यांची ओटी भरतात व त्यांना हरभऱ्याची वाटली डाळ आणि पन्हे देतोत . ज्यांच्या घरी दोलोत्सव नसतो त्या स्त्रिया महिन्याभराच्या काळात एक दिवस केवळ सुवासिनींना हळदीकुंकू देतात . शक्य आहे तिथे जागरण करतात .

Read more...
 
जीवंतिका पूजन
Vratavaikalye

जीवंतिका पूजन

हे चातुर्मासातील एक पारंपारिक व्रत असून श्रावणाच्या दर शुक्रवारी हे व्रत करतात . या दिवशी सात जिवंतीकांच पूजन करतात . जीवंतिका ह्या सप्तदेवता असून त्या माणसाच्या अर्भक , शिशु , बाल , पौगंड , तारुण्य , प्रौढत्व व वृद्धत्व या सात अवस्थांना प्रभावित करतात . या सात देवतांची चित्रे असलेले मुद्रित पट मार्केटमध्ये मिळतात . त्यात सात जीवंतिका व सात बालके अशी सात चित्रे असून या चित्रपटाचे स्त्रिया दर शुक्रवारी पूजन करतात व श्रावण महिन्याच्या शेवटी त्याचे विसर्जन करतात . पूजेत या पटाला हार फुले वाहून जिवंतीकांची आरती म्हणतात . काही कुटुंबात मुला - मुलींना औक्षण केले जाते . संततीस दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभावे म्हणून हे व्रत करतात . सायंकाळी सुवासिनींना हळदी - कुंकू , दूध व साखरफुटाणे देतात .

Read more...
 
प्रदोषव्रत
Vratavaikalye

प्रदोषव्रत

हे व्रत म्हणजे प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करून सूर्यास्तानंतर प्रदोष काळात शिवपूजा करणे . नंतर भोजन करून उपवास सोडतात . पंचांगात प्रदोष काळाचा उल्लेख ठळकपणे केलेला असतो तो पाहावा . प्रदोष काळ सोमवारी असेल तर त्यास सोम प्रदोष , मंगळवारी असेल तर भौम प्रदोष व शनिवारी असल्यास शनि प्रदोष म्हणतात . महिन्यातून असे दोन प्रदोष काळ असतात . अनेक कुटुंबात हे व्रत पिढ्यानपिढ्या चालू असते . काही जण विशिष्ट कामनाप्रित्यर्थ हे व्रत तीन वर्षे किंवा बारा वर्षे करतात . या व्रतामुळे माणसाच कौटुंबिक व ऐहिक जीवन सुखच होत आणि भक्ती व उपसानेतही प्रगती होऊन पारमार्थिक आनंद मिळतो . जीवनात समाधान , तृप्ती आणि कृतार्थतेचा आनंद मिळतो .

Read more...
 
मंगळागौरी व्रत
Vratavaikalye

मंगळागौरी व्रत

श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रियांनी आपलं सौभाग्य अखंड टिकण्यासाठी मंगळागौरीची पूजा करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे . या व्रताचा कालावधी पाच वर्षे किंवा सोळा वर्षांचा असतो . या दिवशी नवविवाहिता उमा - महेश्वराची पूजा करतात . काही ठिकाणी या पूजेसाठी सोळा सुवासिनींना बोलावण्याची पद्धत आहे . या दिवशी संध्याकाळी सुवासिनींना हळदी - कुंकू देऊन गव्हाने त्यांच्या ओट्या भरतात . रात्री मंगळागौरीची आरती करून मंगळागौर जागवतात . गाणी , उखाणे , फुगड्या , नाव घेणे , विविध प्रकारचे मंगळागौरीचे खेळ करून रात्र जागवतात . दुसऱ्या दिवशी सकाळी दहीभाताचा नैवेद्य दाखवून मंगळागौरीचे विसर्जन करतात .

Read more...
 
वैभवलक्ष्मी व्रत
Vratavaikalye

वैभवलक्ष्मी व्रत

हे व्रत किमान अकरा किवा एकवीस शुक्रवार करतात . स्त्रियाच हे व्रत करीत असल्या तरी पुरुषांनीही हे व्रत केले तरी चालते . या व्रतामुळे परीक्षेत यश मिळते , लग्न ठरते , कौटुंबिक सुख प्राप्त होते आणि आर्थिक संकटांचे निवारण होऊन धनसंपदेचा लाभ होतो अशी सर्वांची श्रद्धा आहे .

व्रताच्या शुक्रवारी उपवास करून सायंकाळी पूजाविधी झाल्यानंतर नैवेद्याचा प्रसाद ग्रहण करायचा असतो . उपवास शक्य नसल्यास फलाहार करूनही हे व्रत करता येते . एखाद्या शुक्रवारी अशीच किंवा मासिक पाळी आली तर तो शुक्रवार सोडून नंतरचा करावयाचा असतो . कोणत्याही परिस्थितीत संकल्प केल्याप्रमाणे सर्व शुक्रवार व्रतस्थपणे पूर्ण करायचे असतात .

Read more...
 
श्रीलक्ष्मी व्रत
Vratavaikalye

श्रीलक्ष्मी व्रत

संपत्ती , समृद्धी व धन यांची बरकत प्राप्त होण्यासाठी हे व्रत करतात . या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी करतात व शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करतात . त्यानंतर वर्षभर दर गुरुवारी देवासमोर बसून श्रीलक्ष्मी व्रताची कथा व श्रीलक्ष्मी महात्म्याच वाचन कराव . हे व्रत स्त्री - पुरुष दोहोनीही केलं तरी चालत . मार्गशीर्षातील दर गुरुवारी दिवसभर उपवास करून संध्याकाळी श्रीलक्ष्मीची पूजा व आरती करून उपवास सोडवा व आपली इच्छा श्रीलक्ष्मी मातेला सांगावी . काही जण कायम स्वरूपी गुरुवारचे उपवास करतात . या व्रताची माहिती देणारी पुस्तिका बाजारात उपलब्ध असते .
त्यात सांगितल्याप्रमाणे हे व्रत करावे .

Read more...
 
संकष्ट चतुर्थीचे व्रत
Vratavaikalye

संकष्ट चतुर्थीचे व्रत

हे व्रत खूप लोकप्रिय व्रत असून लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत अनेक स्त्री पुरुष हे व्रत नित्य नेमाने व श्रद्धेने करतात . दर महिन्याची वद्य चतुर्थी म्हणजे संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी होय .या दिवशी उपवास करतात . ज्यांना उपवास झेपत नाही ते फलाहार घेतात . रात्री स्नान करून गणेशपूजा करून त्यास २१ मोदकांचा नैवेद्य दाखवतात . गणपतीला दुर्वा आणि जास्वंदीचे लाल फुल त्यावेळी अवश्य वहावे . गणपतीची मनोभावे पूजा करून गणेश स्त्रोत्र म्हणावे . काही जण देवळात जाऊन गणपतीचे दर्शन घेतात . चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदर्शन करून साध जेवण करून उपवास सोडतात . ज्यांना वेळ असतो ते संध्याकाळी श्रीगणेशाची षोडशोपचारे पूजा करतात . अथर्वशीर्षाने अभिषेक करतात .

Read more...
 
संतोषी मातेचे व्रत
Vratavaikalye

संतोषी मातेचे व्रत

कौटुंबिक जीवनात संतुष्टता देणारी देवी म्हणजे संतोषी माता अशी मान्यता आहे . भारतातील सर्व राज्यातील सर्व जातीधर्माच्या स्त्रिया हे व्रत करतात .

या व्रताची माहिती देणारी पुस्तिका बाजारात उपलब्ध असते . त्यात सांगितल्याप्रमाणे हे व्रत करावे .

या व्रताची सुरुवात चातुर्मासात करतात . हे व्रत चार महिने , एक वर्ष किंवा तीन वर्ष दर शुक्रवारी करायच असत . किमान सोळा शुक्रवार हे व्रत करून त्याच उद्दापन करतात . काही अडचण आली तरी घरातील इतर कुटुंबियांकडून संतोषी मातेची पूजा करावी व कहाणी वाचून घ्यावी . उपवास मात्र आपण स्वतः करावा .

Read more...
 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 1 of 2
Facebook Image

twiter


sankalp-ad2

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla