Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
Marathi Utsav , Marathi Festivals, Functions
हनुमान जयंती
Utsav

हनुमान जयंती

राम जन्मापाठोपाठ येणारी रामभक्त हनुमानाची जयंती चैत्र पौर्णिमेस मोठ्या प्रमाणावरउत्साहाने साजरी केली जाते . हनुमान म्हणजे , सामर्थ्य , भक्ती आणि दास्यभावाचा सजीव पुतळा . हनुमंताची राम निष्ठा खरोखरीच अवर्णनीय होती .
हनुमंताची उपासना म्हणजे स्वामी निष्ठेची भक्ती , शक्तीची पूजा आणि सेवाभावाचा आदर होय . हनुमंताजवळ केवळ शक्तीच नव्हती तर -बुद्धी चातुर्याची युक्तीही होती . रामराज्य येण्यासाठी राज्यकर्त्यांचे चारित्र्य रामासारखे हवे आणि प्रजाजनांच्या ठायी हनुमान्तासारखी राज निष्ठा , पराक्रम , सामर्थ्य आणि सेवाभाव असावा हेच या उत्सवातून शिकायला हवे .
या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी होते . त्यानंतर दिवसभर हनुमान मंदिरात भजन - कीर्तनाला रंग चढतो . तरुणाईला पराक्रमाच आणि देश सेवेसाठी साहसाच आव्हान या दिवशी मिळत . ते जर तरुणांनी स्वीकारलं तर राम राज्य येणं फारसं कठीण नाही . या दिवशी भाविक उपवास करतात . हनुमंत हा सात चिरंजीवपैकी एक चिरंजीव होय .

Read more...
 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 2 of 2
Facebook Image

twiter


sankalp-ad2

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla