Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
Marathi Utsav , Marathi Festivals, Functions
पारंपारिक नवरात्रोत्सव
Utsav

पारंपारिक नवरात्रोत्सव

नवरात्रामध्ये भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये देवी म्हणजेच घट बसवण्याची वेगवेगळी पध्दत आहे. ही पध्दत जरी वेगळी असली तरी त्या मागची श्रध्दा, आपलेपणा, प्रेम हे सारखेच अनुभवायला मिळते. यावेळी महाराष्ट्र व गुजरात राज्यात नवरात्रामध्ये होणारी पूजा आपण पाहणार आहोत.
महाराष्ट्र :
ghat in navaratraमहाराष्ट्रात देशावर घट बसवण्याची पध्दत आहे. काही ठिकाणी रुजवण घातलं जात. ती कसे घातले जाते ते पाहूयात. घट बसवणे म्हणजे रुजवण घालण्या आधी घरातल्या देवांची यथासांग पूजा केली जाते. ते करताना घरातल्या देवांना पंचामृताने अभिषेक करुन पुसून प्रत्येक देव खायच्या दोन पानांवर ठेवले जातात याला आसन देणं म्हणतात. नंतर त्यांची पूजा केली जाते. नवरात्रात देवांना हलवता येत नाहीत. हे झाल्यावर एका टोपलीमध्ये पत्रावळीत थोडी ओली काळी माती घालून त्यात मूग, चवळी, मटकी, मका, कुळीथ, नाचणी, हरभरा, करडई, बाजरी, ज्वारी, भात, जव यापैकी कोणतीही नऊ धान्य मिसळावी.

Read more...
 
"दुर्गे दुर्घट भारी"....
Utsav

"दुर्गे दुर्घट भारी"....

navratri-goddess-durgaहल्ली वेध लागले आहेत ते नवरात्रोत्सवाचे. दुष्टांचा संहार करणा-या आदिमाया, अंबाबाई, आदिशक्तीचा जागर करणारा सण. या सणात नऊ दिवस अखंड आदिशक्तीची आराधना केली जाते. अशी हि आदिशक्ती अनेक गावात वसलेली आहे. या आदिमायेची अनेक रूपे अनेक ठिकाणी वसलेली आहेत. महाराष्ट्र आणि मुंबई मध्ये या आदिमायेची अनेक मंदिरे आहेत. या मंदिरातील देवीची रूपे, त्यांची वैशिष्टे याची माहिती “रूपे मातेची ” या सदरातून..

Read more...
 
व्रते व उपवास का करतात ? महाशिवरात्रीबद्दल थोडेसे …
Utsav

व्रते व उपवास का करतात ? महाशिवरात्रीबद्दल थोडेसे …

mahashivratri vratपुराणांमधे प्रत्येक देवतेची काही व्रते सांगितली आहेत. सोप्या शब्दात व्रत या शब्दाचा अर्थ आहे धार्मिक नियम. आजकाल स्वतःला आधुनीक विचारसरणीचे म्हणवणारे काही जणं व्रतं-वैकल्यांची टिंगल वा उपहास करताना आढळतात कारण त्यांना त्यामागील योगशास्त्रीय भुमिकाच समजलेली नसते. आपल्याकडे व्रतं ही बरेचवेळा काहीतरी काम्यकर्म मनात धरून केली जातात. जसे आर्थिक उन्नती, पुत्रप्राप्ती, विवाह विषयक, पारिवारीक सुखसमृद्धी इत्यादी.
व्रतांचे पालन करण्यामागे काही आध्यात्मिक कारणे आहेत जी जास्त महत्वाची आहेत.
व्रते मनाला आणि शरीराला शिस्त लावतात :
माणसाचे मन हे स्वैर वागण्यात जास्त आनंद मानते. पण हे स्वातंत्र्य एका मर्यादेपर्यंत असेल तर ठीक नाहीतर हेच स्वातंत्र्य स्वैराचार बनते आणि आपल्या अध्यात्मिक प्रगतीला बाधक ठरते. व्रतांचे पालन केल्याने आपल्या मनाला वेसन घालण्याचे शिक्षण मिळते आणि मग योग, अध्यात्म हे जाचक वाटत नाही.
व्रतांमुळे पूजा अर्चा , आरत्या , जप, स्तोत्र पाठ इ मुळे माणसाच्या श्रद्धेत आणि भक्तीत वाढ होते. व्रतामुळे माणसाच्या इच्छाशक्तीत प्रचंड वाढ होऊ शकते.
व्रतांमध्ये करण्यात येणारा उपवास हा निसर्गोपचार आणि आयुर्वेदात अत्यंत महत्वाचा मनाला गेला आहे. उपवासाने पचन संस्थेला आराम मिळतो. आणि शरीरातील दुषित पदार्थ बाहेर घालवण्यास वाव मिळतो. पण उपवासाच्या नावावर एकादशी दुप्पट खाशी ! मात्र काही उपयोगी ठरत नाही.
श्रीशंकराची काही लोकप्रिय व्रते म्हणजे महाशिवरात्रीचे व्रत, सोमवार व्रत आणि प्रदोष व्रत.

Read more...
 
आषाढी एकादशी
Utsav

आषाढी एकादशी

vithu mauli-205x300आषाढाच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीस 'देवशयनी एकादशी असे म्हणतात . या दिवशी चातुर्मासाची सुरुवात होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते . लाखो वारकरी त्यावेळी विठ्ठल नामाच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमून टाकतात . महाराष्ट्रात या दिवशी उपवास व श्रीविठ्ठलाची पूजा केली जाते . भजन , पूजन , कीर्तन , हरीकीर्तनासाठी जागरण असे उपक्रम आयोजले जातात . अनेक ठिकाणी या दिवशी दिंड्या निघतात व त्यात लहानथोर सहभागी होतात . पंढरपूर येथे विठ्ठलभक्तीचा सुकाळ असतो . विठ्ठल दर्शनाने पायवारीची समाप्ती झाल्याने वारकरी मंडळीना जीवाचा जिवलग भेटावा असं समाधान मिळत . चंद्रभागेच स्नान करून हि मंडळी घरी परततात . या एकादशीच हे व्यापक स्वरूप पाहता तीचं महाएकादशी हे नाव सार्थ ठरत .

Read more...
 
गुरु पौर्णिमा
Utsav

गुरु पौर्णिमा

Guru-Purnima-2016-आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणून साजरी होते . व्यास मुनी यांनी वैदिक संस्कृतीच्या जडण घडणीच फार मोठ कार्य केल आहे . चार वेद , भक्तीचा सुकाळ घडवून आणणारी अठरा पुराणे , महाभारतासारखा अलौकिक ग्रंथ अशा अलौकिक ग्रंथ रचना करून त्यांनी वैदिक संस्कृतीचा आचार व विचार भारतीय समाजासमोर पिढ्यानपिढ्या साठी ठेवला .भगवान श्रीकृष्णानेही त्यांचा गौरव केला आहे . व्यक्ती आणि समाज या दोहोंचाही उद्धार घडवून आणणारा सम्यक विचार त्यांनी जगाला दिला . मानवी जीवनाबद्दलची करुणा आणि मानवी जीवनाचा उद्धार घडवून आणण्याची अपार कळकळ यामुळेच व्यासमुनींना ज्ञानी - प्रज्ञावंतानी गुरुपद देवून त्यांची पूजा केली . व्यास पूजा म्हणजे गुरुपूजा होय .

Read more...
 
तुलसी विवाह
Utsav

तुलसी विवाह

tulsi vivahकार्तिक शु . द्वादशीस तुळशीचे लग्न कृष्णाशी लावण्याची प्रथा आजही अनेक कुटुंबात पाळली जाते . तुळशी विवाहासाठी कार्तिक शुक्ल नवमी ही तिथी योग्य आहे. अनेक बायका आषाढी एकादशीस तुळशीच रोप लावून त्यांना चार महिने रोज पाणी घालून वाढवितात आणि या तुळशीचा विवाहविधी कार्तिक शु . द्वादशीस पार पाडतात . तुळस हि अतिशय पवित्र , औषधी आणि बहु उपयोगी वनस्पती असल्याने प्रत्येक दारात तुळशीच रोप लावण्याची परंपरा आहे . तुळस स्त्रियांना अतिशय प्रिय असल्यामुळे तिचे लग्न म्हणजे घरात मोठा आनंद सोहळा असतो . त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत हा विवाह केला जातो . त्रिपुरी पौर्णिमेस त्रिपुर दैत्याचा वध करून शंकराने सर्व देवांना मुक्त केल्यामुळे व त्रिपुराचे निर्दालन झाल्याने या दिवशी देवलोकात दिवाळी साजरी होते . म्हणून या दिवसाला देव दिवाळी असेही म्हणतात . या दिवशी शंकराच्या देवळात त्रिपुर लावण्याची प्रथा आहे . काही ठिकाणी नुसतेच दिवे लावून हा सण साजरा करतात .

Read more...
 
चंपाषष्ठी
Utsav

चंपाषष्ठी

jejuri- champashashtiमार्गशीर्ष शुद्ध षष्ठिस चंपाषष्ठी म्हणतात. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असा सहा दिवसांचा काळ महाराष्ट्रात मार्तंडभैरवाचे म्हणजे खंडोबाचे नवरात्र म्हणून साजरा करतात . जेजुरी येथे हा उत्सव मोठ्या प्रमाणावर होतो. चंपाषष्ठीच्या दिवशी या नवरात्राची सांगता होते. कुलाचाराप्रमाणे पूजेमध्ये कुंभ अथवा टाक ठेवून खंडोबाला प्रिय असलेली झेंडूची फुले अथवा माळा खंडोबाला वाहतात . पहिल्या दिवशी एक, दुसऱ्या दिवशी दोन याप्रमाणे वाढवीत सहाव्या दिवशी सहा फुलांच्या माळा त्याला घालतात.

Read more...
 
गोकुळाष्टमी
Utsav

गोकुळाष्टमी

Dahi Handiकृष्णाभाक्तीचा अलोट पूर म्हणजे गोकुळाष्टमी . श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला कृष्णाचा गोकुळात जन्म झाला म्हणून या तिथीला गोकुळाष्टमी म्हणतात . या दिवशी मध्यरात्री कृष्णजन्माचा सोहळा साजरा केला जातो . दुसऱ्या दिवशी सर्व लहानथोर दहीहंडी फोडतात . कृष्णाने जगण्यातील रिक्तता दूर करून त्यात जीवनरस ओतला आणि ते चैतन्यमय केलं . गोकुळाष्टमी हा दिवस या गुणांचं स्मरण करण्याचा दिवस होय .कृष्णात दैवी गुण अपरंपार असूनही त्याचा आचार व व्यवहार माणसासारखा असल्याने त्याने माणसाच्या अंतःकरणाशी थेट संवाद साधून मानवी जीवनाला परमसुखाच्या वाट मोकळ्या करून दिल्या . श्रीकृष्णाच व्यक्तिमत्व बहु आयामी , सर्व गुण संपन्न आणि सर्व श्रेष्ठ अहे. त्याचं चरित्र हे सर्वस्पर्शी व सर्वव्यापी आहे . पुरुषार्थाची सर्व लक्षणे त्याच्या ठायी मूर्तरूप असल्याने जग त्याला पूर्ण पुरुष मानते .

Read more...
 
दत्तजयंती
Utsav

दत्तजयंती

dattajayantiमहाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या श्रीदत्ताची सर्वसामान्य भक्त दर गुरुवारी अतिशय भक्तिभावाने पूजा व आरती करताना आढळतात . इतकेच नाही तर वर्षभरातून निदान एकदा तरी एखाद्या दत्त स्थानाची यात्रा करून येतात .अत्री ऋषी आणि सती अनसूया यांच्या पोटी जन्मलेल्या श्रीदत्तात्रेय यांना तिन्ही देवांचा अंश म्हणून त्रिगुणात्मकता लाभली . श्रीदत्तगुरू हे नाथपंथीयांचे अधर्व्यू असले तरी महाराष्ट्रातील महानुभाव पंथ आणि वारकरी संप्रदायही त्यांना गुरुस्थानी मानतो . काही जण त्रिमुखी दत्ताची तर काही एकमुखी दत्ताची उपासना करतात . औदुंबराच्या तळवटी दत्ताचा वास असतो व ते नित्य काशी , करवीर आणि माहूर असे त्रिस्थळी भ्रमण करतात असे मानले जाते . अलीकडच्या काळात श्रीपाद वल्लभ , नरसिंह सरस्वती , अक्कलकोट स्वामी , माणिक प्रभू यांना दत्तावतार समजून भक्त त्यांची पूजा करतात .

Read more...
 
रामनवमी
Utsav

रामनवमी

ramnavamiचैत्र शु . नवमी हा श्रीरामाचा जन्मदिवस , म्हणून या तिथीस रामनवमी म्हणतात . रामाला देव मानून आपण त्याची पूजा करतो . रामाला हे देवपण मिळाले ते त्याच्या अंगी असलेल्या एकबाणी , एकपत्नी आणि एकवचनी या अलौकिक गुणांमुळे . त्याच्या राज्यात प्रजा सुखी होती , म्हणून त्याच्या राज्यास रामराज्य म्हणतात .
या दिवशी दुपारी रामजन्म साजरा होतो . त्यानंतर संपूर्ण दिवस रामनामाचा जप , -कथा कीर्तन व राम गुणगान असे कार्यक्रम होतात . अनेक ठिकाणी गीतरामायण म्हटलं जात . रामजन्म म्हणजे आदर्श , मर्यादा आणि सद्गुणांची सगुण पूजा .

Read more...
 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 1 of 2
Facebook Image

twiter


sankalp-ad2

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla