Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
Marathi Festivals, Marathi sanvar
गणपती - गणेशोत्सव
Sanvar

गणपती - गणेशोत्सव

ganesh utsav mumbaiगणेशोत्सव म्हणजे सलग दहा दिवस घरात आणि बाहेर साजरा होणारा उल्हासाचा उत्सव . भाद्रपद शु . चतुर्थीच्या दिवशी पार्थिव श्रीगणेशाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करून तिचे षोडशोपचारे पूजन केले जाते . त्यास अभिषेक करून मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो . आरत्या म्हटल्या जातात . आपापल्या कौटुंबिक प्रथेप्रमाणे दीड , पाच , सात अथवा दहा दिवस गणपती पूजन करून त्या मूर्तीचे समुद्र , नदी किवां तलावात विसर्जन केले जाते . गौरीपूजनाची प्रथा असलेल्या कुटुंबात गौरी व गणपतीचे एकाच दिवशी विसर्जन केले जाते .
विघ्नहर्ता, गणनायक , बुद्धिदेवता म्हणून सर्व देवपूजेत गणपतीला अग्रस्थान आहे . याशिवाय पूजा - प्रार्थनेस प्रसन्न होणारा सर्व सामन्याचा देव अशीही गणपतीची ख्याती आहे . महाराष्ट्रात अनेक गणेश भक्त दर महिन्यातील विनायकी किंवा संकष्टी चतुर्थीचा उपवास करतात . अष्टविनायकाची यात्रा करणे हाही काही भक्तांचा भाविक उपक्रम असतो . माघ महिन्यातील गणेश जयंती सुद्धा काही ठिकाणी कौटुंबिक कुलाचार म्हणून साजरी केली जाते .

Read more...
 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 2 of 2
Facebook Image

twiter


sankalp-ad2

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla