Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
Marathi Festivals, Marathi sanvar
रंगतदार रांगोळ्या
Sanvar

रंगतदार रांगोळ्या

rangoli92रांगोळी म्हणजे भूमी अलंकरण. भूमीला सजवण्यासाठी , देव्हारा , भोजनाची पंगत , अंगण , शुभकार्य स्थळ इ.जागा सुशोभित करण्यासाठी शंखजीऱ्याची  भाजून केलेली पंढरी पूड , तांदुळाची पिठी, खडू इत्यादी साहित्याने काढलेल्या विविध चित्राकृतींना  रांगोळी असे म्हणतात. त्यात रंग भरून ती अधिक आकर्षक बनवली जाते.
रांगोळीत रंग भरताना : काही टिप्स 
प्रथम रंगसंगती ठरवावी मग त्यानुसार रंग भरावेत.
१. एकाच रंगातील अनेक शेड किंवा २.विरुद्ध रंगाच्या जोड्या  उदा. लाल : हिरवा , पिवळा : जांभळा
एक रंग जर फिकट वापरला तर त्याशेजारी गडद रंग वापरावा. दोन भडक रंग जवळ वापरू नयेत.
रांगोळीत अनेक रंग वापरण्या ऐवजी २-३ रंग वापरावेत आणि त्या रंगांच्या फिकट व गडद छटा वापराव्यात.
रांगोळी काढण्यापूर्वी रांगोळी चाळून घ्यावी .जाडी भरडी रांगोळी वापरू नये.
रांगोळीची रेष ही  अत्यंत काटेकोर व नाजूक यायला हवी तरच ती रांगोळी रेखीव दिसते.

Read more...
 
वसुबारस
Sanvar

वसुबारस

vasubarasभारतात अनेक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. अंधारावर मात करून सारा परिसर प्रकाशमान करणाऱ्या दिवाळीची महाराष्ट्रात सुरुवात होते ती आश्‍विन वद्य द्वादशीस सुरवात होते. गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस त्याला गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस असेही म्हटले जाते. सवत्सधेनूची पूजा करण्याचा हा दिवस. भारतीय संस्कृतीमध्ये गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साऱ्या देवांची वस्ती गोमातेच्या शरीरात असते, अशी श्रद्धा आहे. अशी कथा सांगितली जाते की समुद्रमंथनातून ज्या चिजा निघाल्या, त्यामध्ये पाच कामधेनू होत्या. कामधेनू म्हणजे व्यक्त केलेली प्रत्येक इच्छा पूर्ण करणारी गोमाता. खरे तर गाय आणि तिच्यापासून जन्माला येणारे बैल यांच्या जिवावरच प्राचीन काळी शेतीची मदार होती. त्यामुळे गाईची पूजा होणे स्वाभाविकच आहे. क्षीरसागराच्या मंथनातून नंदिनी, शुभदा, सुरभी, सुशीला आणि बहुला या पाच कामधेनू जन्माला आल्या.

Read more...
 
दसरा
Sanvar

दसरा

Dasara“दसरा सण मोठा – नाही आनंदाला तोटा”हा सण नवरात्र संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी येतो . अश्विन महिना म्हणजे पावसाळ्याचा सरता काळ . निसर्ग प्रसन्न असतो आणि शेतीतील पिक समृद्ध झालेली असतात . हे खरे तर सुगीचे दिवस . धानाधान्यामुळे शेतकरी आनंदात असतो . प्रपंचातील इतर कामे करायला त्याला वेळ मिळतो . नवी काम सुरु करता यावी म्हणून तो दसऱ्याचा मुहूर्त धरतो . साडेतीन मुहूर्तांपैकी दसरा हा एक शुभ मुहूर्त होय . या दिवशी पूर्वी शिक्षणाची सुरुवात होत असल्याने या दिवशी सरस्वती पूजन करतात आणि हत्यारांचीही पूजा करतात .

Read more...
 
गुढी पाडवा
Sanvar

गुढी पाडवा

gudhi padavaगुढी पडावा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजेच ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ . रावणाचा वध करून भगवान रामचंद्र अयोध्येला परत आले तो हा दिवस.चौदा वर्षांच्या वनवासानंतर रावणचा वध करून अयोध्येला परतणार्‍या रामाच्या विजयाचे आणि आनंदाचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी (ब्रह्मध्वज) उभारली जाते. असुरी शक्तीवर दैवी शक्तीने मिळवलेल्या विजयाचे प्रतीक हे उंच असते, म्हणून गुढी उंच उभी केली जाते.गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया आणि दसरा म्हणजे प्रत्येकी एक अन् कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे अर्धा, असे साडेतीन मुहूर्त आहेत. या साडेतीन मुहूर्तांचे वैशिष्ट्य असे की, इतर दिवशी कोणत्याही शुभकार्यासाठी मुहूर्त पहावा लागतो; या दिवशी मात्र मुहूर्त पहावा लागत नाही. या दिवसांतील कोणतीही घटिका शुभमुहूर्तच असते.

Read more...
 
श्रावण अमावस्या - पिठोरी अमावस्या
Sanvar

श्रावण अमावस्या - पिठोरी अमावस्या

मातृत्वाचा गौरव करण्याचा, स्मरण करण्याचा दिवस म्हणजे मातृदिन म्हणजेच पिठोरी अमावस्या होय.श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. ज्या स्त्रियांची मुले अल्पायुषी ठरतात किंवा ज्यांची मुले जगत नाहीत अशा फक्त सुवासिनी स्त्रिया पिठोरीचे व्रत ठेवतात.ज्या घरांमध्ये गणपती येतो, अशा घरांमध्ये ‘पिठोरी’चं पूजन होतं.या दिवशी दिवसभर उपास करुन संध्याकाळी आंघोळ करुन सुवासिनी स्त्रिया ही पूजा करतात. विशेषत: चौसष्ट योगिनींची पूजा यामध्ये करतात. चौरंगावर ब्राह्मी, महेश्र्वरी, वैष्णवी, वाराही, कौमारी, इंद्राणी, चामुंडा या सात शक्ती देवतांची स्थापना करतात. पुढे कलशावर चौसष्ट सुपार्‍या तांदूळाने भरलेल्या ताम्हणात चौसष्ट कलांचे प्रतिक म्हणून मांडतात. योगिनी म्हणजे अशा कला ज्यांमुळे उपजिवीका होते . पूर्वी पिठाच्या मूर्ती करत, पण आता यांच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात.

Read more...
 
नारळी पौर्णिमा
Sanvar

नारळी पौर्णिमा

श्रावणात येणारा नागपंचमी नंतरचा हा दुसरा सण आहे. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा म्हणतात.नारळीपौर्णिमा म्हणजे वरुणदेवाची आदरपूर्वक, प्रेमपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस .श्रावण पौर्णिमेस आपण समुद्र हे वरुणदेवाचे प्रतीक मानूनत्याचे पूजन करतो. शास्त्राप्रमाणे सागराची पूजा करून त्याला श्रीफळ अर्पण करण्यात येतो म्हणून या दिवसाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. कोळी समाजाचे आणि सागराचे नाते जिव्हाळ्याचे आणि अतूट असल्याने ते नारळी पौर्णिमा वाजतगाजत, थाटामाटात आणि अतिशय जल्लोषात साजरी करतात. पालखी सजवून त्यात सोन्याचा नारळ (सोन्याचा मुलामा) ठेवतात . नाचत, गात अतिशय जल्लोषात मिरवणूक काढून समुद्रकिनाऱ्यावर येतात. सूर्यास्ताबरोबर नारळाची पूजा करतात . समुद्र देवतेला नारळ समर्पण करतात. वं मनोभावे प्रार्थना म्हणतात. “पर्जन्य वर्षावाने उधाणलेल्या दर्यादेवा शांत हो वं तुझ्या लाटा सौम्य होऊन आमचे वादळ, तुफान इत्यादीपासून रक्षण कर.”

Read more...
 
नागपंचमी (श्रावण शुदध पंचमी)
Sanvar

नागपंचमी (श्रावण शुदध पंचमी)

nagpanchamiनागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजे प्राणीसृष्टी बद्दल प्रेम, दया , कृतज्ञता व्यक्त करणे .गावात शेतकऱ्याना नाग साप खूप उपयुक्त ठरतात . शेतीचा नाश करणाऱ्या प्राण्यांना नाग खाऊन शेताच आणि पिकाच रक्षण करतो . नागाला म्हणून क्षेत्रपाल म्हणतात .या दिवशी बायका नागाची पूजा करतात . जिवंत नागाऐवजी एका कागदावर किवा पाटावर नऊ नागांच चित्र शाईने किवा गंधाने काढून , दूध - लाह्यांचा नैवेद्य दाखवून त्याची पूजा करतात . काही ठिकाणी मातीच्या नागांची पूजा केली जाते . रांगोळीच्या ठिपक्यांचे नाग अंगणात काढतात. चंदनाने पाटावर पाच फण्यांचा नाग काढतात. नवनागांची नावे घेऊन यथासांग पूजा करतात. नवनागांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
१) अनंत २) वासुकी ३) शेष ४) पद्मनाभ ५) तक्षक ६) कालीया ७) शंखापाल ८) कंषल ९) धृतराष्ट्र

Read more...
 
आषाढी अमावस्या - दिव्याची आवस
Sanvar

आषाढी अमावस्या - दिव्याची आवस

आपले जे दैनंदिन संस्कार आहेत त्यात संध्याकाळी देवापुढे समई लावून दिव्याची प्रार्थना करण्याची प्रथा आहे . हा संस्कार बहुतेक सर्व कुटुंबात आजही पाळला जातो . " शुभं करोति कल्याणं " हि प्रार्थना तर सर्व लहान थोरांना पाठ असते . त्यामुळे नित्याचारणात आपण दीप पूजनास खूप महत्व देतो. पण आषाढी अमावास्येला घरातील सर्व दिव्यांची पूजा केली जाते . पूर्वी विजेचे दिवे नसल्याने घरात प्रकाश देणारे अनेक दिवे असत . आज विजेमुळे घरात समई , निरांजन असे मोजकेच दिवे असले तरी त्यांची पूजा या दिवशी करावी असा शास्त्रकार सांगतात . अनेक ठिकाणी या दिवशी पीठाचे दिवे प्रज्वलित करून त्यांचीही पूजा केली जाते .

Read more...
 
गौरीपूजन
Sanvar

गौरीपूजन

gauri pujanगणपती उत्सवाच्या काळात अनुराधा नक्षत्र असलेल्या दिवशी गौरी बसवल्या जातात . ज्येष्ठा नक्षत्रावर त्यांचे पूजन केलं जाते आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन होते . आपल्याला अखंड सौभाग्य लाभावे हा त्यामागचा हेतू असतो.कोकणस्थ लोकांमध्ये खडयाच्या गौरी आणतात. एखादी सवाष्ण किंवा मुलगी नदीकाठी, तळयाकाठी अथवा विहीरीपाशी जाऊन चार खडे ताम्हणात घेउन ते खडे वाजत गाजत घरी आणतात. गौरी आणताना ज्या सवाष्णीने ताम्हणात खडे घेतले असतील तिने मुक्याने चालने आवश्यक आहे .

Read more...
 
अक्षय तृतीया
Sanvar

अक्षय तृतीया

वैशाख महिन्यातील शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय्य तृतीया . साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त . अक्षय्य तृतीये दिवशी तृतीया तिथी, सोमवार किंवा बुधवार आणि रोहिणी नक्षत्र हे तीन्ही योग असतील तर तो परमश्रेष्ठ योग मानला जातो . धार्मिक कार्याच्या दृष्टीने हा सण कौटुंबिक पातळीवर श्रद्धेने पाळला जातो . या दिवशी अनेक कुटुंबात तर्पण करून आपल्या पुर्वासुरींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते . या दिवशी जप , हवन किंवा दानधर्म ,तिलतर्पण करणे, उदककुंभदान करणे, मृत्तिका पूजन करणे ही प्रथा आहे . ही सर्व धार्मिक कार्ये या दिवशी केल्यावर त्यांचं पुण्य अक्षय्य टिकतं अस मानलं जात . अक्षयतृतीयेच्या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ अन्नदान, वस्त्रदान, जलदान, करण्यात येते.

Read more...
 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 1 of 2
Facebook Image

twiter


sankalp-ad2

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla