Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
मराठी म्हणी
Mhani , Vakprachar

मराठी म्हणी

मराठी भाषेचे अलंकार म्हणी आणि वाक्प्रचार हे खरंच मराठी भाषेचे सौंदर्य वाढवतात. एखाद्या स्त्री ने अंगावर २-४ दागिने घातल्यावर तिचे सौंदर्य जसे खुलून दिसते तसेच भाषेत व लिखाणात म्हणी आणि सुविचार यांचा वापर केल्याने भाषेचे सौंदर्य आणि वजन अधिक वाढते.
म्हणी व वाक्प्रचारांमुळे कमीत कमी शब्दात आपल्या लिहिण्यातला व बोलण्यातला आशय नेमकेपणाने व्यक्त होतो.मराठी भाषेत अशा अनंत म्हणी आणि असंख्य वाक्प्रचार आहेत. या वेबसाईट द्वारे त्यांचे संकलन करून त्यांचा थोडा परिचय करून देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. हे संकलन म्हणजे समुद्रातून ओंजळभर वेचलेले पाणी होय पण एवढ्यानेही तुमची भाषा तुम्ही नक्की समृद्ध करू शकाल याची खात्री आहे.

म्हणी

१. अगं अगं म्हशी मला कुठे नेशी

२. अति तेथे माती
३. अडला हरी गाढवाचे पाय धरी
४. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी
५. असतील शिते तर जमतील भुते
६. अती शहाणा त्याचा बैल रिकामा
७. असंगाशी संग प्राणाशी गाठ
८. अळवाची खाज घशालाच कळते
९. अती राग भीक माग
१०. अजमास पंचे दाहोदरसे
११. अती परिचयात अवज्ञा १२. अस्वलाचा कां दरवेशाच्या हाती
१४. असे शांतता ज्या घरी तेथे लक्ष्मी वास करी
१५. असून अडचण नसून खोळंबा
१६. अती खाणे मसणात जाणे
१७. आली अंगावर घेतली शिंगावर
१८. आडात नाही तर पोहोऱ्यात कुठून येणार
१९. आधी पोटोबा मग विठोबा
२०. आपला तो बाब्या दुसऱ्याच ते कार्ट
२१. आपलेच दात आपलेच ओठ
२२. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास
२३. आवळा देऊन कोहळा काढणे
२४. आयत्या बिळावर नागोबा
२५. आलिया भोगासी असावे सादर
२६. आयजीच्या जीवावर बायजी उदार
२७. आपला हात जगन्नाथ
२८. आधी जाते बुद्धी मग जाते भांडवल
२९. आलं भेटी धरलं वेठी
३०. आधी केले मग सांगितले
३१. आधी कळस मग पाया
३२. आकाश फाटल्यावर ठिगळ कुठवर लावणार ?
३३. आधणातले रडतात सुपातले हसतात
३४. आप भाला तो जग भाला
३५. ओल्याबरोबर सुकेही जळते
३६. आळश्याच्या दारी गंगा
३७. आई जेऊ घालीना , बाप भीक मागू देईना
३८. अंथरून पाहून पाय पसरावे
३९. अंगापेक्षा बोंगा मोठा
४०. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन
४१. आंधळे दळते कुत्रे पीठ खाते


४२. इकडे आड तिकडे विहीर
४३. इच्छा तेथे मार्ग
४४. उथळ पाण्याला खळखळाट फार
४५. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
४६. उचलली जीभ लावली टाळ्याला
४७. उडदामाजी काळे गोरे
४८. उगवत्या सूर्याला नमस्कार
४९. उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी
५०. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये
५१. उंदराला मांजराची साक्ष
५२. उंटावरून शेळ्या हाकणे

५३. एका हाताने टाळी वाजत नाही
५४. एक ना धड भाराभर चिंध्या
५५. एकादशीच्या घरी शिवरात्र
५६. एकटा जीव सदाशिव
५७. एकाच माळेचे मणी
५८. एक नूर आदमी दास नूर कापडा
५९. ऐकावे जणांचे करावे मनाचे

६०. कथा कुणाची व्यथा कुणाला
६१. कर नाही त्याला दार कशाला
६२. कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले , तरी कडू ते कडूच
६३. करून करून भागला देवपूजेला लागला
६४. कानामागून आली तिखट झाली
६५. काखेत कळसा गावाला वळसा
६६. कावळ्याच्या शापाने गे मरत नाही
६७. कामापुरता मामा ताकापुरती आजी
६८. काळ आला होता पण वेळ आली नव्हती
६९. कावळ्याची नजर पिंडावर
७०. कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच
७१. कुठे राजा भोज कुठे गंगू तेली
७२. कोल्ह्याला द्राक्षे आंबट
७३.कोळसा उगाळावा तितका काळाच
७४. कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही.
७५. खाण तशी माती
७६. खाली मुंडी पाताळ धुंडी
७७. खाई त्याला खवखवे
७८. खायला आधी ,झोपायला मधी , आणि कामाला कधीमधी
७९. खायला कहार,भुईला भार
८०. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी
८१. गरज सरो वैद्य मरो हार
८२. गरजवंताला अक्कल नसते
८३. गर्वाचे घर खाली
८४. गाव करी ते राव न करी
८५. गाता गळा राबता मळा
८६. गाढवाला गुळाची चव काय ?
८७. गाढव मेले ओझ्याने
८८. गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बारा होता
८९. गोगल गे अन पोटात पाय
९०. घर फिरले म्हणजे वासेही फिरतात
९१. घरचे झाले थोडे , व्याह्यांनी धाडले घोडे
९२. घरोघरी त्याच परि
९३. घरोघरी मातीच्याच चुली
९४. घर हिंडते आकाशी, चित्त तिचे पिल्लांपाशी
९५. घी देखा मगर बडगा नाही देखा

९६. चकाकणारे सगळेच सोने नसते
९७. चणे खाई लोखंडाचे तो ब्रम्हपदि नाचे
९८. चंदन घासल्याशिवाय सुगंध येत नाही
९९. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
१००. चोराच्या मनात चांदणे
१०१. चोराच्या उलट्या बोंबा
१०२. चोर सोडून संन्याशाला सुळी
१०३. चोरावर मोर
१०४. चोराच्या हाती लंगोटी
१०५. छडी लगे छमछम ,विद्या येई घम घम
१०६. छिन्नी हातोड्याचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही.
१०७. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण
१०८. जखमेवर मीठ चोळणे
१०९. जाऊ तिथे खाऊ
११०. ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे
१११. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उध्दारी
११२. जुने ते सोने
११३. जे न देखे रवी ते देखे कवी
११४. जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला
११५. झाकली मूठ सव्वा लाखाची
११६. झालं गेलं गंगेला मिळालं

११७. डोळ्यात केर आणि कानात फुंकर
११८. डोंगर पोखरून उंदीर काढणे
११९. ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या , वाण नाही पण गुण लागला


१२०. तळे राखील ते पाणी चाखील
१२१. ताकाला जाऊन भांडे लपवू नये
१२२. तेरड्याचा रंग तीन दिवस
१२३. तीन तिघाडा काम बिघाडा
१२४. तोंड दाबून बुक्क्याचा मार
१२५. तुझे आहे तुजपाशी , परि तू जागा चुकलासी

१२६. थांबला तो संपला
१२७. थेंबे थेंबे तळे साचे
१२८. दाम करी काम
१२९. दात आहेत तिथे चणे नाहीत
१३०. दिव्या खाली अंधार
१३१. दुरून डोंगर साजरे
१३२. दुभत्या गायीच्या लाथा गोड
१३३. दुधाने तोंड भाजले कि ताकही फुंकून पितात
१३४. दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही
१३५. दिसत तसं नसत म्हणूनच तर जग फसतं
१३६. दुधाची तहान ताकावर
१३७. दुसऱ्यास शिकवी ब्रह्मज्ञान आपण स्वत: कोरडे पाषाण
१३८. दुष्काळात तेरावा महिना
१३९. देव तारी त्याला कोण मारी
१४०. देखल्या देवा दंडवत
१४१. दैव देते कर्म नेते
१४२. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ
१४३. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी
१४४. दोन डोळे शेजारी भेट नाही संसारी
१४५. दृष्टी आड सृष्टी
१४६. 'ध' चा 'मा' करणे
१४७. नव्याचे नऊ दिवस
१४८. नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे
१४९. नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने
१५०. न कर्त्याचा वर शनिवार
१५१. नाचता येईना अंगण वाकडे
१५२. नावडतीचे मीठ अळणी
१५३. नाकापेक्षा मोती जड
१५४. नाव मोठे लक्षण खोटे
१५५. नाही निर्मळ जीवन । काय करील साबण
१५६. निंदकाचे घर असावे शेजारी
१५७. निर्लज्जम सदा सुखी
१५८. पळसाला पाने तीन
१५९. पाळता भुई थोडी
१६०. पदरी पडले पवित्र झाले
१६१. पहिले पाढे पंचावन्न
१६२. पायातली वहाण पायात बरी

१६३. पी हळद हो गोरी
१६४. पुराणातली वांगी पुराणात
१६५. पुढच्यास ठेच मागचा शहाणा
१६६. पुढचे पाठ मागचे सपाट
१६७. पेराल तेच उगवते
१६८. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर
१६९. बाजारात तुरी भट भटणीला मारी
१७०. बोलाचीच कढी बोलाचाच भात

१७१. भरवशाच्या म्हशीला टोणगा
१७२. भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी
१७३. भीक नको पण कुत्रा आवर
१७४. भिंतीलाही कान असतात.
१७५. मन चिंती ते वैरी न चिंती

१७६. मनी नसे भाव म्हणे देवा मला पाव
१७७. मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार
१७८. माकडाच्या हाती कोलीत
१७९. मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार ?
१८०. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात
१८१. मोडेन पण वाकणार नाही
१८२. म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो
१८३. म्हशींची शिंगे म्हशीला जड नसतात.

१८४. यथा राजा तथा प्रजा
१८५ ये रे माझ्या मागल्या
१८६. रात्र थोडी सोंगे फार
१८७. लंकेत सोन्याच्या विटा
१८८. लहान तोंडी मोठा घास
१८९. लेकी बोले सुने लागे
१९०. वरातीमागून घोडे

१९१. वाघ म्हटलं तरी खातो वाघोबा म्हटलं तरी खातो .
१९२. विद्या विनयेन शोभते

१९३. शहाण्याला शब्दाचा मार
१९४. शितावरून भाताची परीक्षा
१९५. शीर सलामत तो पगडी पचास
१९६. सरड्याची धाव कुंपणापर्यंत
१९७. समोरच्याला ताट द्यावे पण बसायचा पाट देऊ नये.
१९८. साखरेचे खाणार त्याला देव देणार.

१९९. सब घोडे बारा टक्के
२००. सत्तेपुढे शहाणपण ढ
२०१. सारे मुसळ केरात
२०२. सुख पाहता जवाएवढे ,दुःख पर्वताएवढे

२०३. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी
२०४. स्वात: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही .

२०५. हपापा चा माल गपापा
२०६. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे.

२०७. हौसेला मोल नसते .

२०८. हा सूर्य हा जयद्रथ
२०९. स्वभावाला औषध नाही
२१०. हत्ती गेला शेपूट राहिले.

 

Facebook Image

twiter


sankalp-ad2

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla