Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
Marathi Mhani , Marathi Vakprachar
मराठी म्हणी
Mhani , Vakprachar

मराठी म्हणी

मराठी भाषेचे अलंकार म्हणी आणि वाक्प्रचार हे खरंच मराठी भाषेचे सौंदर्य वाढवतात. एखाद्या स्त्री ने अंगावर २-४ दागिने घातल्यावर तिचे सौंदर्य जसे खुलून दिसते तसेच भाषेत व लिखाणात म्हणी आणि सुविचार यांचा वापर केल्याने भाषेचे सौंदर्य आणि वजन अधिक वाढते.
म्हणी व वाक्प्रचारांमुळे कमीत कमी शब्दात आपल्या लिहिण्यातला व बोलण्यातला आशय नेमकेपणाने व्यक्त होतो.मराठी भाषेत अशा अनंत म्हणी आणि असंख्य वाक्प्रचार आहेत. या वेबसाईट द्वारे त्यांचे संकलन करून त्यांचा थोडा परिचय करून देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. हे संकलन म्हणजे समुद्रातून ओंजळभर वेचलेले पाणी होय पण एवढ्यानेही तुमची भाषा तुम्ही नक्की समृद्ध करू शकाल याची खात्री आहे.

म्हणी

१. अगं अगं म्हशी मला कुठे नेशी

२. अति तेथे माती
३. अडला हरी गाढवाचे पाय धरी
४. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी
५. असतील शिते तर जमतील भुते
६. अती शहाणा त्याचा बैल रिकामा
७. असंगाशी संग प्राणाशी गाठ
८. अळवाची खाज घशालाच कळते
९. अती राग भीक माग
१०. अजमास पंचे दाहोदरसे
११. अती परिचयात अवज्ञा

Read more...
 
वाक्प्रचार
Mhani , Vakprachar

वाक्प्रचार

१. अक्कलखाती जमा होणे
२. अन्नान दशा होणे
३. आग लावणे
४. आगीत तेल ओतणे
५. आकाश ठेंगणे होणे
६. आभाळाला ठिगळ लावणे
७. आदळ आपट करणे
८. आभाळ फाटणे
१०. आकाश कोसळणे
११. आरती ओवाळणे
१२. आनंदावर विरजण पडणे
१३. आकाश पाताळ एक करणे
१४. औट घटकेचे राज्य
१५. अंगाचा तिळपापड होणे
१६. अंत पाहणे
१७. औषधावाचून खोकला जाणे

Read more...
 


Facebook Image

twiter


sankalp-ad2

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla