Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
लठ्ठपणा- शंका समाधान
आरोग्य लेख

'लठ्ठपणा- शंका समाधान'

आजच्या धावपळीच्या जीवनात लठ्ठपणा ही खूप मोठी समस्या होऊ लागली आहे.जगभरात २ अब्ज लोक लठ्ठ्पणाने ग्रासलेले आहेत.लठ्ठपणा म्हणजे शरीरात प्रमाणापेक्षा जास्त मेद असणे.जेव्हा व्यक्तीचे वजन त्याच्या उंची आणि वयाच्या प्रमाणे अपेक्षित असणाऱ्या वजनाच्या २०% हून जास्त असते तेव्हा त्या व्यक्तीची लठ्ठपणात गणती होऊ शकते.

लठ्ठपणा मोजण्याचे सगळ्यात सोपे प्रमाण म्हणजे body mass index or BMI.व्यक्तीचा BMI जर २५ ते २९ च्या मध्ये असेल तर त्याला अपेक्षे पेक्षा जास्त वजन असलेल्या गटात घालावे लागेल.पण BMI. ३० पेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीला लठ्ठ म्हणावे लागेल.त्यामुळे आज Diet & Nutrition assistance ची नितांत गरज आहे.

फक्त लठ्ठ व्यक्तीच नाही तर कृश व्यक्तींना आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तिसऱ्या गटातील, म्हणजे आजच्या घडीला अपेक्षित वजन असणाऱ्या व्यक्तींना Diet & Nutrition assistance ची गरज आहे.कारण अपेक्षित निरोगी वजन कायम राखणे हि गोष्ट खूप कठीण झालेली आहे.

ह्या अपेक्षित निरोगी वजन नसण्याने फक्त सामाजिक न्यूनगंडच नाही तर अनेक शारीरिक विकार निर्माण होतात.

 • लठ्ठपणामुळे हृदयरोग ,मधुमेह, काही ठराविक प्रकारचे कॅन्सर असे काही प्राणघातक विकार होऊ शकतात.
 • मुख्यतः पोटाभोवती मेद जमा झाल्याने हृदय विकार आणि Metabolic ( चयापचय ) क्रियेचे विकार वाढतात.
 • शास्त्रीय दृष्ट्या हे सिद्ध झाले आहे की, वजन कमी करून लठ्ठपणामुळे होणारे आजार टाळणे शक्य आहे. १० किलो वजन कमी करण्याने लठ्ठ्पणाने होणाऱ्या अकाली मृत्यूचे प्रमाण २०-२५% ने कमी होते.
 • कृश व्यक्तीना विविध micro & Macro Nutrient कमतरतेमुळे होणारे विकार होतात.
 • कृशपणामुळे शरीरातील विविध महत्वाच्या अवयवांवर ताण येऊन प्राणघातक विकार होऊ शकतात.

आज आपण लठ्ठपणा बद्दल बोलूया:

लठ्ठपणा हा खूप complex आजार आहे. Genetic, भावनिक,सांस्कृतिक आणि सामाजिक कारणांचा ह्या आजारावर पगडा आहे.

व्यक्ती जेव्हा चलनावलनाच्या गरजे पेक्षा जास्त calories खाण्यातून मिळवते तेव्हा ती लठ्ठपणा च्या आहारी जाते.त्यामुळे अनेक लोकांसाठी खूप खाणे आणि खूप व्यायाम करणे हे ह्या समस्येचे उत्तर वाटू लागते.पण त्याहून अनेक जास्त कारणे ह्या समस्येपाठी लपलेली आहेत,

 • वय – आपल्या वाढत्या वया बरोबर आपला metabolism rate कमी होऊ लागतो.त्यामुळे आपणास निरोगी वजन राखण्यासाठी कमी calories लागतात.
 • लिंग – स्त्रियांमध्ये सहज वजन वाढण्याचा काळ जास्त असतो. कारण पुरुषांमध्ये resting metabolic rate जास्त असतो. तसेच स्त्रियांमध्ये पाळी बंद झाल्या नंतर metabolic rate आणखीन कमी होतो.
 • Genetics ( जेनेटीक्स) – लठ्ठपणा आणि कृशपणा हा कुटुंबात सारखा असल्याचे आढळते. शास्त्रीय दृष्ट्या हे सिद्ध करण्यात आले आहे की दत्तक मुलांमध्ये त्यांच्या जन्मदात्या पालकांचेच लठ्ठपणा किंवा कृशपणा हे गुण आढळतात.
 • सांस्कृतिक आणि सामाजिक सवयी – Genetic प्रभाव महत्वाचा असला तरी काही प्रमाणात व्यक्तीच्या सांस्कृतिक आणि सामाजिक सवयी सुध्दा लठ्ठपणा साठी कारणीभूत ठरतात.  जसे खाण्यापिण्याच्या सवयी, चलनवलन ,,झोपण्याचे तास, इ.
 • चलनवलन – ज्या व्यक्तींचे चलनवलन जास्त असते त्या व्यक्तींना जास्त calories ची गरज असते. पण लठ्ठ व्यक्तींमध्ये जास्त चलनवलन केल्यास शरीरातील साठलेला मेद वापरला जाऊन भूक कमी होते.
 • मानसिक करणे – मानसिक कारणांमुळे सुध्दा लठ्ठपणा येऊ शकतो, कारण अनेक व्यक्ती दुखीः किंवा नको असलेले विचार टाळण्यासाठी खात राहतात. ह्याला Negative Emotion Response असेही म्हणतात.
 • आजार – हे कारण लोकांना वाटते तितके रोजचे नसले तरी काही आजार असे आहेत ज्यामुळे लठ्ठपणा येतो. Hormone चे विकार, मानसिक विकार आणि काही दुर्मिळ आजारात वजन वाढण्यकडे शरीराचा कल जातो.
 • औषधे – काही औषधांमुळे सुद्धा शरीराचा लठ्ठपणाकडे कल जातो. जसे काही antidepressant औषधे .

लठ्ठपणा कमी करण्यासाठी २ ध्येये ठेवणे गरजेचे आहे:

१)       निरोगी वजन गाठणे

२)     निरोगी वजन कायम टिकवणे.

यशस्वी आणि कायमस्वरूपी निरोगी वजनासाठी , चलनवलन वाढवणे, खाण्यापिण्याच्या सवयी सुधारणे, आणि तुमच्या सांस्कृतिक व सामाजिक सवयी बदलणे गरजेचे आहे.

हे बदल सुसह्य आणि आकर्षित कसे असावेत हे आपण पुढील भागात बोलूया....

 

-   डॉ. अस्मिता कारभारी.

संबधित लेख- तुळस एक अत्यंत गुणकारी औषधी ...

तुमचे काही अभिप्राय व सूचना किंवा आमच्या सदरांबद्दल अधिक माहिती तुमच्याकडे असेल तर त्याचे सदैव स्वागतच असेल.संपर्क  :Email : This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

Facebook Image

twiter


sankalp-ad2

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla