Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
तुटपुंज्या आमदनीचे नियोजन
अर्थ लेख

तुटपुंज्या आमदनीचे नियोजन

arthsansakr-2कमी कमाईमध्ये धनसंचय सुद्धा कमीच होणार, पण होणार हे नक्की. आपल्यापैकी कित्येक जणाची जमाराशी हि केवळ आयकराच्या ८० सी मधील आयकर वाचवण्यासाठी केलेल्या गुंतवणूकी मुळेच संचित झालेली असते. पण नुकताच कमवायला लागलेल्या तरुणाला कमाईच्या २० % रक्कम साठवणे अत्यंत कठीण कर्म वाटणं साहजिक आहे. कमी कमाई करणाऱ्या प्रत्येक तरुणाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे, पुढच्या महिन्याच्या पगाराआधीच खर्च वाट पाहात थांबलेले असतात.


प्रथमतः प्रत्येक तरुणाने हे ठरवणं महत्वाचं आहे की दर महिन्याला २० टक्क्यापर्यंत बचत करता येणं खरोखरच शक्य आहे का. तरंच वर्षाच्या शेवटी अमुक एक रक्कम उभी करण्याच्या वस्तुस्थितीचा विचार करणे सयुक्तिक होईल. स्वतःच्या खर्चावर थोडीशी बंधनं घालूनसुद्धा महिन्याचे अनिवार्य एकत्रित खर्च - घरभाडं, वीजबिल, प्रवास, जेवणखाण, फोन इ. - एकूण कमाईच्या ८० टक्क्यांच्यावर जात असेल तर; मासिक २० टक्के बचत अशक्य आहे. अशा परिस्थितीत आयकर वाचवण्यासाठी बचत करण्यापेक्षा थोडा आयकर भरून चार जास्तीचे पैसे हातात ठेवण्यासाठी कमाई वाढण्यासाठी प्रयत्न करणे जास्त उपयुक्त ठरेल.
एखाद्याला जर बचत करणं शक्य आहे असं वाटत असेल, पण त्यासाठी लागणाऱ्या शिस्तीचा अभाव जाणवत असेल तर 'खर्चा आधी बचत' हा मूलमंत्र नक्कीच उपयुक्त ठरेल. अशा परिस्थितीत दर महिन्याला बँकेत पगार जमा झाल्याबरोबर बँकेशी आधीच ठरवून ठेवल्याप्रमाणे साधारणपणे पगाराच्या २० टक्के रक्कम त्याच बँकेत रिकरिंग अकाउंट मध्ये आपोआपच जमा होईल अशी सोय करून ठेवणे.
वर्षभरात जमा झालेली हि रक्कम विम्याचा हप्ता वर्षाच्या शेवटी एकरकमी भरण्यासाठी नक्कीच उपयोगात येऊ शकते. याच प्रमाणे खर्चाचे नियोजन करून इतर खर्च आणि बचतीचे मार्ग कुणीही उपयोगात आणू शकतो.

 

Facebook Image

twiter


sankalp-ad2

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla