फॅशन लेख
|
एव्हरग्रीन साडी - या साड्या तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्कीच हव्यात !!!
साडी ही खरी भारतीय स्त्रीची ओळख. इतर देशातल्या स्त्रियांनी आपल्या देशातले पारंपरिक पोशाख सोडून स्कर्ट , पॅन्ट, शर्ट इ पाश्चिमात्य पोशाखांचा स्वीकार केला असला तरीही भारतात अजूनही साडी आऊट ऑफ फॅशन झालेली नाही. आज धावपळीच्या कामांमुळे स्त्रिया पंजाबी सूट्स , शर्ट पॅन्ट इ. रोज ऑफिसला जाताना वापरत असल्या तरीही सणावारांना , समारंभाला साडी हीच त्यांची पहिली पसंती असते. आजही भारतात अधिक पेहराव असलेला पोशाख म्हणजे साडीच आहे . शिवाय तरुण मुलींमध्येही साडीची क्रेझ भरपूर दिसून येते. साड्या नेसण्याच्या विविध पद्धती भारतात प्रांतवार प्रचलित आहेत. महाराष्ट्रात नऊवारीचा काष्टा घालून नेसलेली साडी , तर गुजरात मध्ये गुजराती पद्धतीची साडी तर बंगाल मध्ये किल्ल्यांचा जुडगा पदराला बांधून खांद्यावर मिरवण्याची निराळी पद्धत !!
|
Read more...
|
फॅशन लेख
|
जीन्स वापरा आता पावसाळ्यातही ….
फॅशनच्या युगात जीन्स असा एक पेहराव आहे की कधी आऊटडेटेड होत नाही. कितीही जुनी किंवा बोअर वाटली तरी फॅशन प्रेींमध्ये जीन्सची क्रेझ अजूनही कायम आहे. दररोज कॉलेजला जाताना इस्त्री करण्यात वेळ जातो म्हणून त्यावरील उत्तम उपाय म्हणून जीन्सचा वापर होतो. जीन्सला तशी कुठं रोज इस्त्री करावी लागते. जीन्समध्ये हायवेस्ट, मीड वेस्ट हे प्रकार तर फेव्हरेट होतेच मात्र लो वेस्ट जीन्सनेही तरुणांध्ये जादू केली आहे. जीन्स सोबत शर्ट, टी शर्ट, शॉर्ट शर्ट, कुर्ता नवा लूक देतं.
|
Read more...
|
फॅशन लेख
|
" फॅट टू फिट होण्याचा अव्वल फंडा.."
Health is wealth म्हणतात ते काही चुकीच नाही. आळसे कार्यभाग संपतो असे म्हणतात, पण उत्तम आरोग्य असणाऱ्याला आळस कधीच येत नाही.याउलट लठ्ठपणा म्हणजे माणसाला कायम चिंताग्रस्त करणारी अवस्था.शिवाय यातून अनेक समस्याही निर्माण होतात. रक्ताचा उच्च दाब सांध्यांचे विकार मधुमेह यांच्यासारख्या गंभीर रोगांबाबाद स्थूलता हि निमित्त स्वरुपाची असते.म्हणूनच उत्तम आरोग्य राखायचे असेल तर त्याची गुरुकिल्ली म्हणजे रोजचा व्यायाम आणि संतुलित आहार!आहार घेतल्याने शरीरात शक्तीचा साठ होत असतो आणि कामांमुळे आणि रोजच्या कष्टांमुळे ती शक्ती खर्च होत असते.
निरोगी माणसाच्या शरीरातशक्ती संचय आणि व्यय यांचे प्रमाण सम रहाते म्हणून त्याचे वजन स्थिर राहते. स्थूल माणसाच्या शरीरात मात्र हि अवस्था विषम असते.म्हणूनच 'आहार नियंत्रण' हा स्तुलता निवारण्याचा एक महत्वाचा उपाय आहे.हालचाल करण्यासाठी आणि रीरांतर्गत अवयवांना काम करण्यासाठी उर्जेची (उष्णतेची) गरज असते. उष्णता आपल्याला रोजच्या आहारातून प्राप्त होते. |
Read more...
|
|
|
|