Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
हृद्यस्पर्शी 'गणवेश
मनोरंजन लेख

हृद्यस्पर्शी 'गणवेश

ganveshसुप्रसिद्ध कॅमेरामन अतुल जगदाळे आगामी ‘गणवेश’ या सिनेमाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. नुकतंच या सिनेमाचं टिझर रिलीझ झाला आहे. विजयाते एन्टरटेन्मेन्ट प्रेझेंन्ट या सिनेमात एका वीटभट्टी कामगार जोडप्याची आणि त्यांच्या मुलाभोवतीची कथा गुंफण्यात आली आली आहे. १५ ऑगस्टच्या निमित्ताने स्वातंत्र्य ह्या विषयावर आधारीत भाषण करण्यासाठी त्यांच्या मुलाची निवड होते. पण त्यासाठी शाळेचा ‘गणवेश’ आवश्यक असतो. या ‘गणवेश’मागे नेमकी कोणती कथा उलगडते हे रंजक पध्दतीने सिनेमात पाहायला मिळेल.


‘गणवेश’ ही एका जिद्दीची कहाणी आहे. अभिनेते किशोर कदम, अभिनेत्री मुक्ता बर्वे, स्मिता तांबे, दिलीप प्रभावळकर अशी तगडी स्टारकास्ट सिनेमात असून त्यांच्यासोबतच बालकलाकार तन्मय मांडे प्रमुख भूमिकेत आहे. ‘गणवेश’ला पार्श्वसंगीत मंगेश धाकडे यांनी दिलं असून गुरू ठाकूर यांनी लिहिलेल्या गीतांना नंदेश उमप आणि उर्मिला धनगर यांनी स्वरसाज चढवला आहे.

 

‘गणवेश’ येत्या 24 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे

Facebook Image

twiter


sankalp-ad2

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla