Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
बदलते घरकुल मुंबईचे .....
घरकुल लेख

बदलते घरकुल मुंबईचे .....

adhar घर हे दोघांचं असतं
ते दोघांनीच सावरायच असतं,
एकाने पसरलं तर,
दुसर्‍याने आवरायच असतं,

- चंद्रशेखर गोखले

माणूस हा एखादया पक्षापेक्षा काही वेगळा नाही, ही पाखरं दिवसभर आकाशात उंच भरारी घेतात, यथेच्छ भिरभिरतात पण संध्याकाळ झाली की घरटयाकडे परतू लागतात.माणसांचही काही वेगळ नाही, दिवसभराच्या कष्टांनंतर हा क्षीण दूर करण्यासाठी एखादया मायेच्या पदराआड जावं आणि आपल्या सगळ्या कष्टांच निवारण व्हावं अस प्रत्येकालाच वाटतं आणि पावलं आपोआपच आपल्या घराकडे वळू लागतात. आणि मग उंबरठा ओलांडला की सगळ्या चिंता, दु:ख बाहेर ठेवून एका प्रसन्न वास्तूत आपण प्रवेश करतो.अगदी लहान बाळ असो वा 80-90 वर्षाचे वृध्द प्रत्येकालाच आपल्या घरकुलाची ओढ मात्र कायम असते.

आठवणींच्या आधी येते...खेडयामधले घर कौलारू घर कौलारू...

 

या ओळी ऐकून कोणालाही आपल्या गावच घर आठवेल, अहो आपली  आजची ही    प्रगत मुंबई  दिसतेय तिचा  जन्मही एका चिमुरडया खेडयाप्रमाणे असणार्‍या नगरातून झाला आहे. ही मुंबई  नगरी एका मोठया स्थित्यंतरातून जात आहे. कौलारू घरं, वाडया, छोटया इमारती जाऊन इथे उंच उंच मनोरे  उभे  रहात आहेत. अगदी मराठमोळी  असणारी  मुंबई  इतर सर्वांना समावून इंदधनूप्रमाणे सप्तरंगी झाली  आहे.  याच मराठमोळ्या संस्कृतीत इतर भाषा आणि संस्कृतीनींही आपल्या छटा मिसळल्या आहेत.घर म्हटलं की घर-बांधणी, घर - खरेदी, घराची सजावट एवढचं नव्हे तर ज्योतिषशास्त्र, वास्तूशास्त्र दृष्टया सामानाची मांडणी हे सर्व मुद्दे डोळ्यासमोर येतात. पण कधी कधी काही माहिती अभावी प्रत्यक्षात स्वप्नातलं घर उतरवताना आपली दमछाक होते.म्हणूनच काही गोष्टी ज्या अशा वेळी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात अशा सर्व गोष्टींची माहिती या सेक्शनमध्ये आपल्यासाठी देण्याचा प्रयत्न केला आहे.

महागाई कितीही वाढो मग भले " घर पहावं बांधून"  या म्हणीप्रमाणे दमछाक का होईना, स्वप्नातल घर सत्यात उतरवायच हा मुंबईकरांचा  हट्ट मात्र अबाधितचं!म्हणूनच तर या प्रक्रियेत आमचा थोडा तरी हातभार लागावा, या इच्छेनेच या सेकशन मधून वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश पाडण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे.

 
 
Facebook Image

twiter


sankalp-ad2

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla